
बीड. महाराष्ट्रातील महिलांनी स्वावलंबी व सक्षम व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत यापैकी नुकतीच सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री यांनी लडकी माझी बहीण ही योजनी जाहीर केल्याने महिला वर्ग हा अर्ज करण्यासाठी सर्वच सेतू सुविधा केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आल्याचे चित्र दिसत असून राज्य सरकारने काही अटी लागू करत ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवावी असे आवाहन केले आहे.यातील पात्र महिलाना दरमहा 1500 रुपये बँक खात्यात जमा होणार असून सेतू सुविधा केंद्र,अंगणवाडी सेविका यांना प्रती अर्ज 50 रुपये प्रमाणे राज्यसरकार देणार असे जाहीर केले तरीही लाडक्या बहिणीकडून काही सेतू केंद्र चालक 100 रुपये घेत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे लाडक्या बहिणीला याची झळ सोसावी लागत असून पैसे घेणाऱ्या सेतू केंद्रावर बीड जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.