प्रवीण दरेकर यांना मराठा समाजाने हाकलून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल
"अभि तो ये शूरुवात आहे आगे आगे देखिये होता है क्या".

वीर(प्रतिनिधी) संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल याआधी ओबीसी नेते बोलल्याने त्यांना चांगलेच महागात पडत होते आता तर मराठा नेत्यांना,मंत्र्यांना देखील मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा उपोषणास सुरुवात केली त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केल्याने भाजपचे नेते प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर व उपोषणावर टीका केल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे मुंबई येथील कांदिवली,समता नगर मध्ये एका कार्यक्रमानिमित्त गेले असता मराठा समाजाने विरोध करत जोरदार घोषणाबाजी केल्याने त्यांना कार्यक्रमामधून परत जावे लागले.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून दरेकरां समोर एक मराठा लाख मराठा देखील देण्यात आल्या, मराठा समाज आक्रमक झाल्याने दिसत आहे.