ताज्या घडामोडी
मनोज जरांगे पाटील यांच अटक वॉरंट जारी
अटक वॉरंट काढण्याची गरज नव्हती,मी काय दहशतवादी आहे का? मनोज जरांगे

वीर (प्रतिनीधी)नाट्य निर्मितीची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे सह दोन सहकाऱ्यावर नाट्य प्रयोग सादर करून त्याचे पैसे न दिल्याने कोथरूड पोलीस ठाण्यात 2013 साली गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याप्रकरणी न्यायालयाने दोन वेळा समन्स बजावले होते,तेव्हा एकवेळा जरांगे हे कोर्टात हजर राहिले परंतु आंदोलन व उपोषणामुळे नंतरच्या तारखेला हजर राहता आले नसल्याने न्यायालयाने जरांगे पाटील सह दोघांवर अजामिनपात्र अटक वॉरंट बजावले मनोज जरांगे चांगलेच संतापले असून मी काय दहशतवादी आहे का?असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्हिडिओ न्याय विभाग तसेच गृह विभाग असल्याने ते मला जेलमध्ये टाकून जेलमधील कायद्याकडून मला जीव मारण्याचा सुद्धा माहिती मिळत असल्याचे जरांगे यांनी मीडिया समोर सांगितले.