ताज्या घडामोडी
दवाखाण्यात तलवार घेऊन दहशत माजवणारे दोघे पोलीसांच्या ताब्यात
बीड शहर पोलिस,डी.बी.पथकाची कारवाई

वीर(प्रतिनिधी)बीड शासकीय रुग्णालय परिसरात दुपारच्या सुमारास दोघे हातात तलवारी सारखे धारदार शस्त्र घेऊन फिरत असून त्यांनी दहशत मजवण्याचा प्रत्यन करत असल्याची माहिती बीड शहर पोलिसांना मिळताच तत्काळ डी.बी.पथकांनी शासकीय रुग्णालयात जाऊन त्या दोघांना पकडून चोप देत तलवारी जप्त करून पोलीस अंमलदार अशपाक सय्यद यांच्या तक्रारीवरून दोघांवर दहशत माजवण्याचा व शस्त्रबंदी कायद्यानुसार नासीर खान पठाण,शेख साजिद शेख रा.दाऊदपुरा या दोघांना अटक गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर , उपविभागीय विश्वभर गोल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाणे निरीक्षक शितल कुमार बल्लाळ,पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, सुसेन पवार, जयसिंह वायकर,अश्फाक सय्यद यांनी कारवाई केली.