“ज्ञानराधा”मधील ठेवीदारांचे पैसे मिळणार का.?
अर्चना कुटे सह संचालक मंडळ अजूनही फरार कसे?

वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेट चे चेअरमन सुरेश कुटेनी 3700 कोटी रुपयांचां चुना लावल्याचे दिसत आहे. ठेवीदाराचे पैसे वेळेवर नाही मिळाल्याने काही ठेवीदारांनी न्यायालयात तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने सुरेश कुटे व आशिष पाटोदकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.परंतु अर्चना कुटे सहसंचालक मंडळ अजूनही फरार कसे?असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे.यामुळें पोलिसांच्या कार्यपद्धती व कारवाईवर संशय व्यक्त होत आहे.आठ महिन्यापासून सुरेश कुटेनी ठेवीदारांना आश्वास देत आपली संपत्ती विकन्यात व्यस्त होते असे ठेवीदाराकडून बोलण्यात येत आहे, केवळ भावनिक करून माझ्या आई-वडिलांचे नावे ज्ञानराधा ही मोठी असल्याने कोणाची फसवनुक करणार नाही,सर्वांचे पैसे देणार असे आश्वासन दिले मात्र ठेविदराचे पैसे दिले नाही.त्यामुळे ठेवीदारानी उपोषण,आंदोलन व रस्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला.बीड जिल्ह्यातील ठेविचा आकडा 3000 कोटीच्या वरती असून खरच ठेवीदारांना पैसे परत मिळणार का?असा प्रश्न पडला असून ठेवीदारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. अर्चना कुटे सह संचालक मंडळ यांना तात्काळ अटक करून त्यांची संपत्ती जप्त करून ठेवीदाराचे पैसे परत मिळावे अशी अपेक्षा करण्यात येत आहे.