चोरीच्या मोटरसायकल शिवाजी नगर पोलिसांनी केल्या जप्त
शिवाजी नगर पोलिसाची दबंग कारवाई,इतर मोटरसायकलचा शोध सुरू

वीर(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात दिवसेंनदिवस वाढ झाली असून, मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळण्यात असल्याचे बीड दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी बीड स्थानी गुन्हे शाखेने बार्शी नाक्यावर दोन आरोपींना पकडून त्यांच्याकडून दहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या होत्या.शिवाजीनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की,आज दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बीड शहरातील अंबिका चौकात एक इसम(विधी संघर्ष ग्रस्त बालक)हा चोरीच्या मोटर सायकल सह उभा आहे अशी माहिती मिळतात पो.कॉ.आघव,पो. काँ. रहाडे,पो. कॉ.सारनीकर यांनी अंबिका चौक येथे जाऊन ही काहीच मला सुझुकी एक्सेस सह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने ही दुचाकी श्रीराम नगर बीड येथून चोरून आणल्याची कबुली दिली. त्याला पकडून सखोल चौकशी केली असता त्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याचे सांगितले.एक विना नंबर काळ्या रंगाची युनिकॉर्न,एक पॅशन प्लस जप्त करून त्याच्या चेसिस नंबर वरून माहिती काढली असता एक दुचाकी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तर दुसरी दुचाकी ही लातूर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तर सुझुकी एक्सेसी बीड श्रीराम नगर येथून 8/2024 रोजी गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रमुख खेडकर पो.कॉ. सुदर्शन सारणीकर, रविंद्र अघाव,बाळू रहाडे यांनी करवाई केली असून अधिक तपास रवींद्र आघावं करत आहेत.