अल्पवयीन मनोरुग्न मुलीवर अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
पोलीसानी स्वतःफिर्यादी देऊन नराधमावर केला गुन्हा दाखल.

वीर(प्रतिनिधी)बीड शहरातील बार्शी नाका भागातून एका मनोरुग्ण अल्पवयीन मुलीला दिनांक 18 जुलै रोजी रात्री 11:30 वाजता बिर्याणी खाऊ घालतो असे सांगून बार्शी रोड,दूध डेअरी च्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ नेऊन कपडे काढून अत्याचार केल्याची माहिती बीड पोलिसांना मिळताच पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले व रात्री त्या मुलीला भाजी मंडई येथील जिव्हाळा निवारा केंद्रात सोडण्यात आले.मात्र स्थानिक नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी यात आवाज उठवत त्या नराधमावर बलात्कार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत पेठ बीड पोलीस ठाणे निरीक्षक अशोक मोदिराज यांच्याकडे केली. पीडित मुलीचे आई वडील किंवा नातेवाईक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येत नसल्याने पो.हे.हनुमंत उगले यांनी तपास करून अश्फियान खलील मोमीन वय 28 वर्ष व इमरान खलील शहा वय 32 वर्षे, यांनच्या आणखी एकाविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात पोस्को कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्यामध्ये अधिक तपास करण्याकरिता नुकतेच सुरू केलेल्या सीसीटीव्हीच्या पाहणीवरून मुलीला मोटरसायकल वरून बसून नेल्याचे निदर्शनास आले. दोन आरोपींना अटक केली असून एक आरोप फरार आहे.ही कामगिरी बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज, पोलीस उपनिरीक्षक नित्यानंद उबाळे, पोलीस उपनिरीक्षक सलमान शेख,पो.हे.सुभाष मोटे,पो.हे.नितेश माने,पो.हे.हनुमंत उगले,पो.कॉ.बालाजी बास्टेवाल व पो.अमोल ससाणे यांनी केली.