ताज्या घडामोडी
चोरट्यांनी दुचाकीसह चार चाकी चोरल्याची घटना कॅमेरात कैद
बीड शहरातील घटना,नागरिकात भीतीचे वातावरण

वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील राजीव नगर भागातून काल मध्यरात्री दोन चोरट्यांनी मोटरसायकल चोरून त्या मोटरसायकलवर बसून शहरातील अंकुश नगर भागात गेले चोरी केलेली मोटरसायकल तिथेच सोडून अंकुशनगर भागातील एका पोलीस कर्मचाऱ्याची चार चाकी गाडी चोरली ही घटना 3:45 वाजता घडली.चोरीच्या घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून गाडी घेऊन जाताना दोघे चोर दिसत आहेत.बीड शहरात चोरीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून चोरीच्या प्रकरणी दुपारपर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.