ताज्या घडामोडी
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबई रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली,उद्या डिस्चार्ज मिळणार

वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना बऱ्याच दिवसापासून पोटात पोटात दुखत होते परंतु, दौरे व सभा यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करत होते.गेल्या दोन तीन दिवसापासून पोट दुखण्याचा त्रास जास्त वाढल्याने मुंबई येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यांनच्या पित्ताशयात खडे झाले असल्याचे तपासण्यामध्ये आढळून आले तपासणी मध्ये आढळून आले. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.काल मुंबई येथील इस्पितळात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्तशयाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.