ताज्या घडामोडी
वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर महसूल विभागाची कारवाई.
बीड जिल्ह्यात दररोज शेकडो वाहनाने वाळू,मुरूम वाहतूक होते.

वीर(प्रतिनिधी) वाळू उपसा,मुरूम उत्खननावर व वाहतुकीवरबंदी असताना देखील,बीड जिल्ह्यात दररोज शेकडो वाहनाने वाळू मुरूम वाहतूक बिनधास्त केली जाते. याकडे महसूल व उत्खनन विभाग डोळे झाक करत असल्याचे दिसत आहे.महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी सकाळी जालना रोडवर वाळू वाहतूक करणारी दोन वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये वाळू असल्याचे निदर्शनास आल्यावर त्या वाहनांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लावून पुढील कारवाई करण्यात आले असून,महसूल विभागा कडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.