
वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील नगर रोड वरील पोलीस पेट्रोल पंप येथे शाळेवर जाण्यासाठी दुचाकित पेट्रोल भरण्यासाठी लाईन मध्ये उभे असलेले शिक्षक बाबासाहेब निवृत्ती मिसाळ वय 54 वर्षे रा.भक्ती कंट्रक्शन बीड यांना हृदयविक्रातीवर झटका आल्याने त्यांचा जागेवरच कोसळून मृत्यू झाला. मिसाळ हे माजलगाव तालुक्यातील वारोळा येथे माध्यमिक आश्रमशाळा मध्ये ज्ञानदानाचे कार्य करत होते. शाळेवर जाण्यासाठी पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता हृदयविकाराचा झटका आल्याने खाली कोसळले पेट्रोल पंपावरील कामगारांनी त्यांना सत्कार जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.