चोरांनी दिवसा रेकी केल्याचा संशय,व्हिडिओ मध्ये पहा.
चोरांच्या भीतीने नागरिकात भीतीचे वातावरण

वीर(प्रतिनिधी) बीड शहरामध्ये मागील काही दिवसापासून चोरट्यानी धुमाकूळ घातला असून चोरांच्या भीतीने नागरिकांनी आपल्या भागात रात्रीचे जागरण सुरू केले आहे.बीड शहरात चोरीच्या प्रमाणापेक्षा अफवात जास्त पसरवल्या जात असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे.दोन दिवसांपूर्वी दोन चोरट्यांनी अंकुश नगर मधील दुचाकी चोरल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्यांची चार चाकी गाडी चोरून नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानंतर काल दुपारी बीड शहरातील खंडेश्वरी भागातील जय हिंद पार्क परिसरात दोन अनोळखी इसम दुचाकीवर फिरत होते,त्यांनी एका महिलेला पत्ता विचारल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु दुचाकीवर बसलेल्यांनी हेल्मेट घातले होते तर महिलेशी बोलणाऱ्यांनी तोंडाला बांधलेले होते यावरून हे दोघे रेकी करत असल्याचा संशय नागरिकानी व्यक्त केला असून पेठ बीड पोलिसांना माहिती कळतात त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व विचारणा केली असता ते पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ते गेट पर्यंत आले होते अशी माहिती सांगण्यात आली असून त्या दोघांचा शोध घेत असल्याची माहिती पेठ बीड पोलिसांकडून मिळाली आहे.