
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे. या संघर्षाला सर्वच राजकीय पक्षांचे नेते खतपाणी घालत आहेत.
पंढरपूर : मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत.या पाठीमागे मोठे राजकीय षडयंत्र आहे. ओबीसींची मते भाजपाला जावीत यासाठीच जरांगे हे फडणवीस यांच्यावर सतत टीका करत आहेत. जरांगे आणि फडणवीस यांचे हे भांडण नकली आहे. त्यामुळे त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, असा हल्लाबोल ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव रॅली पंढरपुरात आली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला मनोज जरांगे-पाटील कसे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.