ताज्या घडामोडी
बीड बस स्थानकातील चिखलामुळे प्रवाशाचे हाल
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा चिखल,पाण्यातून प्रवास

वीर( प्रतिंनीधी) बीड येथील नवीन बस स्थानकाचे काम गेल्या दीड,दोन वर्षापासून सुरू आहे.हे काम संथ गतीने चालू असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने बीड बस स्थानकात पाणी साचले असून चिखल झाला आहे,पायी चालणे मुश्किल झाले आहे त्यामुळे प्रवाशांना या पाण्यातून मार्ग काढत चिखल तुडवावा लागत असल्याने प्रवासात संताप व्यक्त होत आहे. एका महिला प्रवाशाने तर सांगितले की”हे सर्वात भुक्कड बस स्थानक आहे.”सध्या शैक्षणिक वर्ष चालू झाल्याने विद्यार्थी पास साठी गर्दी करत आहेत त्यांना देखील या चिखलातून मार्ग काढावा लागत असल्याने विद्यार्थी,वृद्ध व प्रवाशाचे हाल होत आहेत त्यामुळे प्रशासनाने तात्पुरते उपाययोजना करून मुरूम टाकून द्यावा अशी मागून प्रवाशातून होत आहे.