मनोज जरांगे यांना दिर्घायुष्यासाठी निघालेल्या पायी दिंडीवर परळीत हल्ला
हल्ल्यातील आरोपींच्या अटकेसाठी मराठा समाजाचा रस्त्यावर ठिय्या

वीर(प्रतिनिधी)मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा 1 तारखेला वाढदिवस असल्याने यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून परळी ते तुळजापूरला पायी दिंडी काढण्यात आली होती.महापुराच्या पुतळ्यांना आभिवादन करून ही दिंडी तुळजापूरकडे निघाली असता वैद्यनाथ मंदिरासमोर मराठा बांधव अजय देशमुख या तरुणाला परळी येथील गुंडांनी बेदम मारहाण करण्यात आली.आरोपींना अटक केल्यावरच ही दिंडी पुढे जाणार असं मराठा बांधावा कडून सांगून रस्त्यावर ठिय्या करत घोषणाबाजी करण्यात आली. निवडणूक पूर्वी आणि नंतर देखील मराठा तरुणांना असेच मारहाण झाल्याचे प्रकार घडला असून पोलीस प्रशासनात बघायचे भूमिका घेत असल्याचे आरोप मराठा बांधवांनी केला आहे. यानंतर काळामध्ये परळीतील गुंडगिरी ही मुळीच काढू असा देखील इशारा मराठा बांधवांनी दिला असून भ्याड हल्ले करणाऱ्या आरोपींना अटक करावे मगच दिंडी तुळजापूरकडे जाणार असल्याचे सांगण्यात आले.