ताज्या घडामोडी
कलरच्या दुकानाला आग लागल्याने चार लाखाचे नुकसान
बार्शी नाका जवळील कलर दुकणाला लागल्याने साहित्य जळून खाक

वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील बार्शी नाका,दूध डेअरी जवळ असलेल्या कलरच्या दुकानाला आज सकाळी सहाच्या दरम्यान कलरच्या दुकानाला अचानक आग लागल्याने चार लाख रुपयांचे नुकसान झाले.आग शॉट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज असून दुकानातील कलरच्या डब्या सह ईतर साहित्य जळून खाक झाले असून अग्निशामक दल व स्थानिक रहिवाशांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग विझवता आली नसल्याची माहिती मिळाली असून सुदैवाने आजूबाजूच्या दुकानाला आग लागली नाही.आगीची माहिती पेठ बीड पोलिसांना माहिती देल्याचे दुकानं मालक मोमीन मुस्तकिंग यांनी सांगितले.