ताज्या घडामोडी
“कोणी लाडकी बहीण,लाडका भाऊ नाही सर्व काही खुर्चीसाठी”हातात फलक घेतलेल्या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधले
बीड बशीरगंज चौकात एक तरुण बॅनर घेऊन उभा.

वीर(प्रतिनिधी) राज्य सरकारने”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना काही दिवसापूर्वी सुरू केली आहे, अर्ज पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले असून,लाडका भाऊ ही देखील योजना राज्य सरकारने राबवली असून त्यांचे शिक्षण दहावी,बारावी झालेल्याना दरमहा आठ हजार रुपये तर पदवी प्राप्त झालेल्यांना दरमहा 10 हजार रुपये देण्याचे जाहीर केली असून ही योजना फक्त खुर्चीसाठी आहे अशा प्रकारचे बॅनर बीड शहरातील बशिरगंज चौकात तरुण उभा असल्याचे निदर्शनास आल्याने या तरुणाची व बॅनरची चर्चा शहरभर पसरल्याने या बॅनरची चांगली चर्चा झाली.