ताज्या घडामोडी
पोलिसांकडून सुरेश कुटेची वाहने जप्त करण्यास सुरुवात
ठेवीदारांना घालणाऱ्या कुटेची बारा मालवाहू वाहने जप्त.

आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टिस्टेट चे चेअरमन अध्यक्ष सुरेश कुटे व संचालक आशिष पाटोदकर सह अर्चना कुटे व संचालक मंडळावर बीड जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यातही विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याने.सुरेश कुटे,आशिष पाटोदकर हे सध्या चौकशीसाठी आर्थिक शाखा जालना पोलिसांच्या ताब्यात असून यांच्या अडचणीत वाढ झाली असून जालना येथील,सदर बाजार पोलिस ठाण्यात बाराशेच्या वर कुटे यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.कुटे ग्रुपची बारा मालवाहू वाहने बीड,तिसगाव वरून ही वाहने पोलिसांनी जप्त करून पोलीस ठाण्यात लावली असून आणखी वाहने जप्त होण्याची शक्यता आहे.