ताज्या घडामोडी
पंकजा मुंडे-प्रकाश आंबेडकर यांनच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा
मा.प्रकाश आंबेडकर यांचे पंकजा मुंडे यांनी केले स्वागत

आनंद वीर(प्रतिनीधी) बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात 24 जुलै रोजी चैत्यभूमी वरून सुरुवात केला होती.आज लातूर वरून बीड कडे येत असताना पंकजा मुंडे व प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन स्वागत करण्यात आले.या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.गेल्या काही दिवसापासून मराठा आणि ओबीसी आरक्षण व आंदोलनामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन केले.आज लातूर शहरात दोन्हीही नेत्यांची भेट झाल्याने आमदार पंकजा मुंडे कडून स्वागत करण्यात आले.यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.