वसतिगृहात विद्यार्थ्यांचा खून ?
शिक्षणीच खून करून प्रेत लटकवल्याचा कुटुंबीयांचा संशय.

आनंद वीर(प्रतिनिधी)परळी तालुक्यातील पांगरी या गावातील अरविंद खोपे हा विद्यार्थी लातूर स्वामी विवेकानंद वसतिगृहात सातवी या वर्गात शिकत होता. अरविंदची परीक्षा आहे असे समजल्यानंतर आई-वडिलांनी अरविंद ला लातूर येथील वसतिगृहात सोडले.29 जुलै रोजी वसतिगृहातील शिक्षकांनी अरविंद च्या आई-वडिलांना फोन करून सांगितले की अरविंदच्या पोटाला काहीतरी लागले असून रक्त येत आहे.आई वडील हे दूर असल्याने त्यांनी नातेवाईकांना वसतिगृहात पाठवले असता,अरविंद चा मृतदेह बाथरूम मध्ये लटकत असताना दिसला त्यामुळे हा खून असल्याचे नातेवाईकांनी व अरविंदच्या आई-वडिलांनी आरोप केला.हे वस्तीग्रह माजी आमदाराचे असून आता सत्ताधारी पक्षाचा नेता आहे या वसतिगृहातील सर्व कर्मचारी फरार झाले असून.12 तासात सीसीटीव्ही गायब केले?,एक पांढऱ्या रंगाची चार चाकी गाडी कोणाची होती? लहान मुलगा शर्ट न फाशी घेईल का? मुलाच्या पोटाला लागले आहे मुलगा पळून गेला आहे मग मृतदेह बाथरूम मध्ये कसा सापडला? असे अनेक प्रश्न आई-वडील व नातेवाईकांना पडले असून सत्ताधाऱ्याचे वसतिगृह असल्याने अध्यापही गुन्हा दाखल करून घेतला नाही, पोस्टमार्टम नाही. आई वडील पोस्टमार्टम रूमच्या बाहेर बसून आक्रोश करत आहेत जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली असून,लातूर पोलिसांनी या खुनाचा छडा लावून आरोपींना तात्काळ अटक करावी, कुटुंबाला न्याय द्यावा व या वस्तीग्रहाचा परवाना रद्द करावा अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.