छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणाला कोणी वाली आहे का?
अंधारे मॅडम महापुरुषांचे पुतळेच अंधारात.! हे क्रीडांगण आहे की राजकीय आखाडा?

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहरातील छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणाची दुरवस्था झाली असून,संभाजी राजे क्रीडांगणावर बरेच राजकीय कार्यक्रम होत असून या मैदानावर खड्डे होत असून पाणी साचत असल्याने फिरण्यासाठी येणाऱ्या महिलांना विद्यार्थ्यांना व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे क्रीडांगण आहे की राजकीय मैदान?असा प्रश्न बीडकरांना पडला आहे.या मधील बरेच साहित्य मोडकळीस आले असून,दुचाकी चार चाकी,वाहने थेट गेटच्या लावल्याने चालण्यासाठी येणाऱ्या नागरिक विद्यार्थी व महिलाना याचा त्रास सहन करावा लागत आहे.1)या क्रीडांगणामधील जीवनातील योग्य,संगर्ष दिशा दाखवणारे महापुरुषांचे अर्धाकृती पुतळ्यावर अंधार असल्याने नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2)या क्रीडांगणावर मोकाट जनावराचा मुक्त संचार आहे,जनावरे चरताना दिसत आहेत.त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला,महिलांना यापासून होवू शकतो.3)तसेच विद्युत खांबावरील सर्व लाईट बंद असल्याने सर्वत्र अंधार होतो त्यामुळे एखादा अनुसूचित प्रकार घडण्याची शक्यता आहे, 4)या क्रीडांगणामध्ये व्यायाम करण्याची अनेक साहित्य मोडळकळी आले असून त्या जागी नवीन साहित्य बसून द्यावे व गेटवर वॉचमन दिसत नसल्याने या क्रीडांगणाला कोणी वाली आहे का नाही? असा प्रश्न पडत आहे.