पालवन चौक ते नगर रोड रस्त्यासाठी उपोषणाचा चौथा दिवस
नितेश उपाध्याय यांची तब्येत खालावल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहरातील धानोरा रोड पालवन चौक ते नगर रोडची दयनीय अवस्था झाल्याने स्थानिक नागरिका सह विद्यार्थ्याना देखील यांचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रेट करून द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर नितेश उपाध्याय यांनी उपोषण सुरू केले होते.या आंदोलनात परिसरातील नागरिकासह, व्यापारी व विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.धानोरा रस्त्यालगत दोन-तीन विद्यालय, मंगल कार्यालय, शिकवणी असून या रस्त्यावरून जाणाऱ्यास गुडघाभर पाण्यातून चालत किंवा विद्यार्थ्यांना सायकलवरून शाळेत यावे लागत होते.तसेच शहर लागत असलेले धानोरा,पालवन सह इतर खेड्यातून येणाऱ्या नागरिकांना देखील या खड्ड्याचा खराब रस्त्याचा सामना करावा लागत असल्याने नागरिकात संताप व्यक्त करत होते. नितीन उपाध्ये यांनी 29 जुलै रोजी उपोषणाची सुरुवात केली होती,आज उपोषणाचा चौथा दिवस असल्याने त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या भागातील विद्यार्थी, महिला व व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सिमेंट काँक्रीट चा रस्ता करून द्यावा अशी मागणी केली होती, त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलून या रस्त्याचे प्रकरण कोर्टात चालू असल्याने सध्या रस्ता करता येत नाही. परंतु तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजूउन देण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले.