
आनंद वीर(प्रतिनिधी) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसापूर्वी संभाजी राजे यांच्या विषयी वडील खासदार झाल्याने संभाजीराजांच्या मनात आग,त्यामुळे त्यांचे बेताल वागणे सुरू असे वक्तव्य केले होते त्याचा निषेध म्हणून स्वराज संघटनेने गाडीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर आव्हाड पुन्हा आक्रमक झाले.मी असल्या हल्ल्याला मी धर्मनिरपेक्षतेच्या विचाराशी तोडजोड करणार नसल्याचे, संभाजीराजे वर आता अधिक द्वेषाने बोलणार असल्याचे सांगितले. अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दोन दिवसापूर्वी असाच हल्ला झाला होता.त्यामुळे महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करणारे नेते व त्यांच्या वाहनावर होणारे हल्ले असे सत्र सुरू राहणार असल्याचे दिसत आहे.