मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असे बॅनर झळकले
हे बॅनर विरोधकांनी खोडसाळपणाने लावल्याचा आरोप.

आनंद वीर(प्रतिनिधी)मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण,आंदोलने केली.या आंदोलनाला महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांनी साथ दिली. रोज रंग यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नसल्याचा आरोप करत,सत्तेतील बऱ्याच मराठा मंत्र्याला खडे बोल सुनावले होते.त्यामुळें आपले लोक जो पर्यंत सत्तेत जात नाहीत,निवडून येत नाहीत तो पर्यंत मराठा आरक्षण मिळणे शक्य नसल्याने आता मनोज जरांगे यांनी विधानसभेसाठी 288 उमेदवारांना उभे करणारा असे जाहीर केल्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली असून सत्तेतील सामील असणाऱ्या मराठा आमदारांना याचा फटका बसणार असल्याची उघडपणे बोलले जात आहे. त्यामुळे काहीनी खोडसळपणाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात “मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार” ,”मराठा आरक्षणाचा पक्ष जरांगे पातलाच मुख्यमंत्री पदावर लक्ष”असे बॅनर लावल्याचे आरोप सकल मराठा समाजातील युवकांनी केला आहे.