दोन महिलां कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
लाच घेण्यात महिला कर्मचारीही मागे राहिला नाही

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालयातील दोन महिलाना लाच घेताना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले.दोन दिवसांपूर्वीच गेवराई शहरात एका मुख्याध्यापकाला शिक्षक म्हणूनच घेताना रंगहात पकडले होते ही घटना ताजी असतानाच पंचायत समिती कार्यालय आष्टी येथील बालविकास कार्यालयातील अमृता श्रीकांत हाटे,नीता रामदास मालदोडे अशी या लाचखोर महिलांची नावे असून मिनी अंगणवाडीची मोठी अंगणवाडी झाल्याने मासिक मानधन 6000 वरून 10000 झाल्याने मानधनातही वाढ झाल्याने बक्षीस म्हणून 5000 रुपयेची मागणी कर्मचारी हाटे व मालदोडे यानी तक्रारदाराकडे केल्याने पंचा समक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना या महिलांना रंगेहात ताब्यात घेऊन आष्टी पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला. महिला देखील लाच घेण्यात मागे राहिल्या नाहीत हे या कारवाईवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांनच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड,श्रीकांत गिराम, संतोष राठोड, सुदर्शन निकाळजे, सुरेश सांगळे, अमोल खरसाडे,अंबादास पुरी, गणेश मेहेत्रे यांनी कारवाई केली.