बीड सायबर मधील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
आज दिवसभरातील दुसरा ट्रॅप,दोन लक्ष पन्नास हजारांची केली होती मागणी.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये लाचखोर कर्मचारी अधिकाऱ्यात लाच मागण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे,त्यावर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत देखील वाढ झाल्याचे दिसत आहे.सकाळी आष्टी येथील पंचायत समितीमध्ये अंगणवाडी ताई कडून लाच घेताना दोन महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असून आज दिवसभरातील ही दुसरी घटना असून, तक्रारदाराचा एक्साइड बॅटरी व इन्व्हर्टर खरेदी-विक्री चा व्यवसाय असून बॅटरीवर इन्व्हर्टर विकल्याचे बिल तक्रारदार यांनी अदा केले होते तरीही कोणतीही खात्री न करताच बीड सायबर ठाणे पोलीस निरीक्षक यांच्याकडून बँक खाते गोठवण्यात आले होते.ते खाते पूर्ववत करण्यासाठी आशिष वडमारे यांनी पंचा समक्ष तीन लक्ष 50 हजार रुपयाची लाच मागितली,त्यावर तडजोड करत तक्रारदाराने दोन लक्ष पन्नास हजार रुपये देण्याचे मान्य करत लाच मिळवण्याचा प्रयत्न केला.पो.ह. वडमारे हे फरार असून त्यांच्याबरोबर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही करावी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, भारत गारदे, श्रीराम गिराम, अंबादास पुरी,निकाळजे गणेश मेहत्रे यांनी कारवाई केली.