ताज्या घडामोडी
सुरेश कुटे पुन्हा बीड पोलिसांच्या ताब्यात.
सुरेश कुटे,अर्चना कुटे सह संचालक मंडळावर गुन्हा दाखल होणे सत्र सुरूच

आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेट चे चेअरमन अध्यक्ष सुरेश कुटे,अर्चना कुटे व संचालक मंडळावर ठेवीदाराने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने सुरेश कुटे, आशिष पाटकर यांच्यावर जालना येथे गुन्हा दाखल झाल्याने त्यांना जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, जालना पोलीस कुटे यांची मालवाहू वाहने जप्त करण्यात आली होती.पोलिसांचा तपास पूर्ण झाल्याने आता पुन्हा चौकशीसाठी बीड पोलिसांनी ताब्यात घेतले असून बीड जिल्ह्यातील माजलगाव,नेकनूर,केज,परळी,वडवणी मध्ये ठेवीदाराणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने त्यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले.ज्ञानराधा मल्टीस्टेट चे संचालक कुलकर्णी सह इतर संचालक फरार असल्याने,हे पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे.