गायरान धारकाच्या उपोषणाचा पंधरावा दिवस
लोकप्रतिनिधी,प्रशासनाचे उपोषणाकडे दुर्लक्ष,गायरान धारक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालणार

वीर(प्रतिनिधी) बीड तालुक्यातील करचुंडी या गावातील नागरिक गायरान धारकांना ७/१२ मिळावा यासाठी गेल्या 15 दिवसापासून गावातच उपोषणास बसले असून,बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.या आंदोलन,उपोषणाची दखल घेत ऑल इंडिया दलित पॅंथर सेनेचे दीपक भाई केदार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन करचुंडी या गावातील नागरिकाच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल व गायरान धारकांनी येत्या सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालावा असे सांगितले. लोकप्रतिनिधींनी या उपोषणाची दखल न घेतल्याने आमदार, खासदार,पालकमंत्री यांनच्या विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या यावेळी बहुजन वंचित आघाडीचे नेते पुरुषोत्तम वीर, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, बालाजी जगतकर ,जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, प्रेम कांबळे,जिल्हा सचिव वसीम शेख, शहर युवा अध्यक्ष अविनाश वाघमारे,अनिल वीर, गायरान धरणे आंदोलकाचे आयोजक जयसिंह वीर सह गावातील नागरिक, गायन धारक उपस्थित होते.