भाजप च्या माजी आमदार संगीता ठोंबरे शरद पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवणार का?

आनंद वीर (प्रतिनिधी) केज विधानसभा मतदार संघातील भाजपच्या नेत्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज शरदचंद्र पवार यांची भेट घेण्यासाठी गेल्याची माहिती मिळत असून, गेल्या तीन-चार वर्षापासून संगीता ठोंबरे या भाजप व राजकारणापासून अलिप्त होत्या.त्या भारतीय जनता पार्टीत नाराज असल्याचे बोलले जात होते.गेल्या आठवड्यामध्ये भाजपचे नेते पंकजा मुंडे यांची विधान परिषद निवड होऊन शपथविधी घेतल्यानंतर अचानक संगीता ठोंबरे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केज मतदार संघामध्ये संगीता ठोंबरे ह्या 2024 विधानसभेसाठी निवडणूक मिळवण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.आज अचानक संगीता ठोंबरे या शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेल्याने राजकारणात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.