ताज्या घडामोडी
छत्रपती संभाजी राजे चौकात अपघातात एक जागीच ठार
छत्रपती संभाजी राजे चौक,बायपास रोडवर अपघात

आनंद वीर(प्रतिनिधी) धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील संभाजी राजे चौक बायपास रोड येथे दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागेवरच ठार झाला असून मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव बांगर सुधीर विष्णू असे असून, रा.भोगलगाव वय 36 वर्ष.हा अपघात शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजी राजे चौकात सायंकाळी 6:30 वाजता दुचाकी स्वराला उडवून चार चाकी वाहन घटनास्थळावरून पसार झाले आहे.अपघाताची माहिती बीड ग्रामीण पोलीसाना दिली असून ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.