
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या वादावर, भांडणावरून गोळीबार करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्याच महिन्यात परळी शहरात गोळीबार केल्याने सरपंच मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास स्व.गोपीनाथराव मुंडे व बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनच्या नाथरा या मूळ गावी,याच गावातील रहिवाशी असलेले महादेव मुंडे व प्रकाश मुंडे यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारातून अनेक दिवसापासून वाद होता.हा वाद टोकाला गेल्याने प्रकाश मुंडे यांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती मिळत असून,यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही तरी, गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष पाटील करत आहेत.बीड जिल्ह्यामध्ये हाणामारी, वार,गोळीबार करण्याच्या प्रकरणात वाढ होत असून यावरून गुन्हेगारावर पोलिसाचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे.