आष्टी मध्ये दूध भेसळ करणाऱ्या कारखान्यावर कारवाई
जिल्हाधिकारी अविनाश पाठक घटनास्थळी भेट,मध्यरात्रीपासून कारवाई सुरू

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील आष्टी दूध भेसळ करण्याचे केंद्र बनले असून, या आधीच्या कारवाई आष्टी मध्येच झाली होती,याआधी देखील दूध भेसळ करण्यासाठी पावडरचा साठा सापडला होता.मागील काही वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये दूध भेसळ करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून यामुळे मानवी जीवनावर,आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. दूध भेसळचा धंदा तेजत चालत असून यामुळे लहान बालकाना विविध रोगास निमंत्रण होत आहे.आष्टी येथे साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली असता कडा येथील महेश मंदिराजवळ टाकळी (आमिया) फाटा अंबादास पांडुरंग चौधरी यांचे साईदत्त एंटरप्राइजेस या नावाने पत्र्याचे गोडाऊन असून या शेडमध्ये दुधामध्ये भेसळ करण्याकरिता ठेवलेल्या केमिकल पावडरच्या 600 च्या पुढे गोण्या अन्न व औषध प्रशासन अधिकारी व पोलिसांनी जप्त केल्या ही कारवाई रात्री तीन वाजल्यापासून सुरू असल्याचे समजते.घटनास्थळी बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी देखील भेट दिली असून पुढील कारवाई सुरू आहे.