
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड नगरपालिकेवर प्रशासन नेमनुक झाल्यापासून बीड शहरवासीना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे, ऐन पावसाळ्यात देखील महिन्यातून एकदाच पाणी मिळत असल्याने नागरिकात संताप व्यक्त होत असून आज शहरातील विविध समस्या बाबद डॉ. ज्योतीताई मेटे यांचे आदेशावरून नगरपालिकेवर मोर्चा काढून समस्येबाबतचे निवेदन देण्यात आले.1)अनेक दिवसापासून शहरातील काही भागात घंट्या गाड्या बंद, 2)महिन्यातून एकदाच पिण्याचे पाणी, त्यातही काही भागात कडून व गटारीचे पाणी येत असली तक्रार 3) मुख्य रस्त्यावर बाजारपेठेत मोकाट जनावरांचा ठिय्या4) वेळेवर नाली सफाई होत नसल्याने व जागोजागी कचऱ्याचे ढी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे 5) शहरातील बऱ्याच भागांमध्ये कुत्र्याचा वावर वाढला असून नागरिकांना चावा घेत असल्याच्या तक्रारी येत आहे.6) शहरातील अनेक भागांमध्ये गुडघाभर खड्डे पडले असून त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.7) शहरातील अनेक भागांमध्ये खांबावरील विद्युत ईट बंद आहेत.अशा अनेक समस्या घेऊन आज शिवसंग्राम पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून निवेदन देण्यासाठी मुख्याधिकारी दालनात गेले असता, मुख्याधिकारीच्या दालनातच नगरपालिकेच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.यावरून असे दिसते की नगरपालिकेवर कोणाचे नियंत्रण राहिले नाही.बीड शहरातील नागरिकांची समस्या बाबत 15 ऑगस्टपर्यंत नगरपालिकेने जर उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा शिवसंग्राम करून देण्यात आला आहे.यावेळी डॉक्टर ज्योतीताई मेटे यांच्यासोबत शिवसंग्राम पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.