पोलिसांना पूर्वकल्पना असताना बीडमध्ये तलवारबाजी,एकाची प्रकृती गंभीर
मुस्लिम बांधवांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील बुंदिलपुरा भागामध्ये दोन गटात काही दिवसापासून भांडण झाले होते,दोघांनाही परस्पर विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. तुझ्या भांडणाची पूर्वकल्पांना पोलिसांना दिली होती. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बुंदीलपुरा भागातील एका प्रार्थना स्थळामध्ये तीन लोकांवर सहा ते साथ लोकांनी अचानक हल्ला केला,या हल्ल्यात दगड विटा व चाकू सारख्या धारदार शस्त्राने मारहाण करत वार करण्यात आले. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून, शासकीय रुग्णालयत उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले.एका प्रार्थनास्थळामध्ये गेल्यावर त्याना मारहाण करण्यात आल्याने या भागातील सर्व मुस्लिम बांधवांनी संताप व्यक्त करत पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा झाले होते.घटनास्थळी विटा,चाकू सापडला असून अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी भेट दिली असून आरोपींचा शोध व पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.