बीड शहाराचा पाणीपुरवठा बंद,कर्मचारी संपावर
गोल्डन कंट्रक्शन कडून कामगारांना पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचारी संपावर

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहरातील नागरिकांना पावसाळ्यात देखील नगरपालिकेच्या ढिसाळ नियजनामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वन-वन फिरावे लागत आहे.शहरातील काही भागात तर महिन्यातून एकदाच नळाला पाणी येते,तर काही भागात गढूळ पाणी येत असल्याची तक्रार येत आहे,याकडे न.पा.मुख्यधिकाऱ्याचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.यातच बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाच महिण्याचे पगार थकल्याने ते संपावर गेले असल्याने काल दिनांक 6 ऑगस्ट पासून बीड शहराचा पाणी पुरवठा बंद झाला असून.एक तास पाणी बंद केले तर एक दिवस पाणी पुरवठा पुढे जातो,आता 15 तासाच्या पुढे झाले असल्याने शहराच्या पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.,गोल्डन कंट्रक्शन या खाजगी कॉन्ट्रॅक्टर ने पाच महिन्यापासून वेतन न दिल्याने कर्मचारी संपावर गेले असून गोल्डन कंट्रक्शन अफसर यांना संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की आम्ही न.प. मुख्याधिकारी यांना वारंवार अर्ज देऊन मागणी करून देखील आमचे थकीत देयक दिले नसल्याची माहिती दिली असून नगरपालिकेने आमचे देयक मंजूर केले की आम्ही पाणी पुरवठा कामगारांचे पगार देऊ असे सांगितले.बीड शहरातील नागरिकांना मात्र या दोघांमध्ये त्रास सहन करावा लागत असून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा बीड नगरपालिकेवर रोष व्यक्त होत आहे.