ताज्या घडामोडी
मारहाण,लूटमार प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इमामपूर शिवारातील घटना,रात्री गावाकडे जाणारास लुटमार करत होते

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहरा लगत असणाऱ्या इमामपूर,वांगी गावाकडे जाणाऱ्या नागरिकास इमामपुर रस्त्यालगत असलेल्या खडी क्रेशर जवळ अंधाराचा फायदा घेत वांगी गावातील इसमाला अडवून मारहाण करत पैसे,मोबाईल काढून घेतल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.रात्री गावाकडे जाणाऱ्या नागरिकाना या आधी देखील लुटमार झाल्याची माहिती मिळत असून त्यांनी गुन्हा दाखल केला नसल्याने लुटमारीत वाढ झाल्याचे दिसत आहे.रात्री गावाकडे जाणाऱ्या नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत