ताज्या घडामोडी
29 ऑगस्ट पर्यंत आरक्षण द्या.नाही तर सर्वांचाच विषय संपला…मनोज जरांगे पाटील
आरक्षण दिले नाही तर 288 जागा लढवणार.

आनंद वीर(प्रतिनिधी) मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठा समजातील लोकांना आरक्षण देण्यात यावे यासाठी उपोषण व आंदोलने केली. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगले ढवळून निघाले.दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीच सुरुवात सोलापूर मधून करण्यात आली.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदणी सापडल्या असून त्या आधारे त्यांना कुनबी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे.सरकारने 29 ऑगस्टपर्यंत आरक्षण दिले नाही तर सर्वांचा विषय संपला,येत्या विधानसभेतील 288 जागा लढवण्यावर ठाम असल्याचे देखील संकेत दिले असून,काहीही झालं तरीही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असे मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलकात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.