पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली अविनाश बारगळ येणार
अविनाश बारगळ कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड पोलीस अधीक्षक म्हणून नंदकुमार ठाकूर यांनी दोन वर्ष सेवा बजल्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बदली करण्यात आली.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या जागी अमरावती वरून अविनाश बारगळ येत आहेत. अविनाश बारगळ यांची कारकीर्द राज्यात चर्चेत राहणारी ठरली होती. अविनाश बारगळ यांनी अमरावतीमध्ये पोलीस विभागात चार वेळा सेवा बजावले आहे.अतिरिक्त पोलीस अधीक्षक, त्यानंतर पोलीस उपायुक्त म्हणून अमरावती शहरात त्यांनी कार्यकाळ उपभोग झाल्यानंतर अमरावती पोलीस अधीक्षक आणि नंतर पुन्हा अमरावतीमध्येच सीआयडीचे अधीक्षक म्हणून गृह विभागात सेवा केली होती. अमरावती शहरांमध्ये चार वेळा वेगवेगळ्या पदावर काम करणारे पोलीस अधिकारी म्हणून अविनाश बारगळ यांची राज्यात चर्चा होती.अमरावती सीआयडी विभागातून बीड पोलीस अधीक्षक म्हणून येत आहेत. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून अविनाश बारगळ यांची ओळख आहे.