चोरट्यांनी केली पोलिसावर दगडफेक.
बीड शहराजवळील घटना,पोलिसावर दगडफेक करत अंधाराच फायदा घेत चोरटे झाले पसार

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहरामध्ये,ग्रामीण भागात देखील काही दिवसापासून चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून,चोरांच्या भिंतीने शहरातील नागरिकांनी आपल्या भागात रात्रीचे जागरण सुरू केले आहे.चोरीच्या घटनेवर आळा बसावा यासाठी पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढवली असून,रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पेंडगाव जवळ पोलीस कर्मचारी संघर्ष गोरे, सचिन जयभाय, शमो शेख,अखिब,खान यांना एका चारचाकी वाहनात चार ते पाच लोकांवर संशय आल्याने त्याला थांबण्यास सांगितले असता, त्यांनी आपल्या जवळील वाहन सुसाट वेगाने धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बीड बायपास मांजरसुंबा च्या दिशेने पळवले.पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग केला असता त्यांनी खजाना विहिरी जवळ असलेल्या महेबूब नर्सरी तेथे टाटा सुमो क्रमांक MH42A2753 हे वाहन सोडून पोलिसावर दगडफेक करत अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.सुदैवाने चोरट्याने केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले नाही.ही घटना रात्री १२:३० वाजता घडली.पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता यात तंबाखू,गुटखा,बिस्कीट पुढ्यासह सामान अढळले.हे सामान हिरापूर ते पेंडगाव दरम्यान असणाऱ्या टपरी मधून चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून चारंचाकी वाहन पोलिसांनी जप्त करून ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.