कुंडलिक खांडे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला
उच्च न्यायालयाच्या पिठाने हे प्रकरण इतर पीठाकडे पाठवले

आनंद वीर(प्रतिनिधी) शिवसेना शिंदे गट माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने कुंडीलीक खांडे सह इतरांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह नोंद झाला.कुंडलिक खांडे यांचा जामीन अर्ज बीड न्यायालयाने फेटाळल्याने,खांडे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात जामीन साठी अर्ज केला होता.खांडे यांचे जामीनवर सुनावणी घेणाऱ्या उच्च न्यायालयाच्या पीठाने हे प्रकरण इतर पिठाकडे पाठवले.आज आठ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान याच गुन्ह्यातील संबंधित एका आरोपीची अटकपूर्वक जामिनीचे प्रकरण याच न्यायालयात असल्याचे निदर्शनास आले. एखाद्या गुन्ह्यातील एखादे प्रकरण ज्या न्यायालया समोर सुरू आहे, त्या गुन्ह्याशी संबंधित इतर प्रकरणे त्यास न्यायालयाने ऐकावीत अशी निश्चित करण्यात आले.त्यामुळे कुंडलिक खांडे यांच्या जामीन वरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने,खांडे यांचा बीड कारागृहातील मुक्काम वाढला आहे.