कुंडलिक खांडे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला
उच्च न्यायालयाच्या पीठाने हे प्रकरण इतर पिठाकडे पाठवले

आनंद वीर (प्रतिनिधी) शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गावातीलच शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने कुंडलिक खांडे व इतरांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला कुंडलिक खांडे हे सध्या बीड जिल्हा कारागृहात असून.त्यांनी जामीनसाठी बीड न्यायालयात जामीन साठी अर्ज केला होता,परंतु न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने खांडे यांनी उच्च न्यायालयात औरंगाबाद अर्ज केला होता.त्याची सुनावणी आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी होती,सुनावणी दरम्यान याच गुन्ह्यातील आरोपीची अटकपूर्व जामीन याच न्यायालयात आहे असे न्यायमूर्तीनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने एकाच गुन्ह्यातील एखाद्या प्रकरणच्या ज्या न्यायालयासमोर सुरू आहे,त्याच गुन्ह्याची संबंधित इतर प्रकरणे देखील त्याच न्यायालयाने ऐकावीत असे न्यायालयात निश्चित करण्यात आले आहे.त्यामुळे आजच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलांना न्या. शिवकुमार डीगे यांच्या बँक समोर जाण्यास सांगितल्याने कुंडलिक खांडे यांचा बीड कारागृहतील मुक्काम वाढला आहे.