तलवाडा पोलीस ठाणे म्हणजे”चोर सोडून संन्याशाला फाशी”
ट्रॅक्टर समोर झोपल्याने वडार समाजातील निष्पाप लोकांवर 353(१३२) दाखल

आनंद वीर(प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील तलवाडा गावातील गणेश नगर भागात राहणारे दत्ता मस्के यांनी बहिणीच्या घरी शिल्लक असलेली वाळू घर बांधकामासाठी ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवले असता मस्के यांनी त्या पोलीस कर्मचारी सांगितले की ही वाळू माझ्या बहिणीच्या घरून मी माझ्या घरी बांधकामासाठी नेत असून मी वाळू वाहतूक करत नाही अशी सत्य परिस्थिती सांगून देखील तो पोलीस कर्मचारी ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घे म्हणत असल्याने मस्के यांच्या घरातील कुटुंबातील लोक पोलिसाला सांगितले की ही वाळू आमच्या घरातील बांधकाम झाले असून उर्वरित शिल्लक राहीलेली वाळू आम्ही बांधकामासाठी नेत आहोत तरी देखील तो पोलीस कर्मचारी ऐकत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना बोलवून ट्रॅक्टर पोलीस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न केल्याने महिला व पुरुष संतप्त होऊन ट्रॅक्टरला पोलीस ठाण्याकडे घेऊन जाण्यास विरोध केला व ट्रॅक्टरला महिला व पुरुष आडव्या झाले देवराव मस्के हे वयोवृद्ध ट्रॅक्टरच्या समोर जमिनीवर आडवे पडले. त्यामुळे पोलिसांनी मस्के कुटुंबातील 34 लोकांवर 353(नवीन सुधारित कलम 132) नुसार गुन्हा दाखल केला. वास्तविक पाहता वाळू माफियांना मोकळीक द्यायची व गोरगरिबांना त्रास द्यायचा व गोरगरीब लोकांनी हूज्जत घातली म्हणून गुन्हे 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल करायचे का? तलवाडा पोलिसाचा कारभार म्हणजेच चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे झाले आहे.अशी चर्चा होत आहे.