ताज्या घडामोडी

पोलिस भरतीत बनावट अंशकालीन प्रमाणपत्र देणारे बीड मधील दोघे अटकेत

बीड तहसील कार्यालयातील प्रकार,बनावट शिक्के जप्त.

आनंद वीर(प्रतिनिधी) पोलीस भरती पारदर्शक व्हावी यासाठी पोलिसांकडून उमेदवाराची कुसुन तपासणी व कागदपत्र पडताळणी केली जाते,तरीही काही उमेदवार बनावट कागदपत्र,प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरती होण्यासाठी प्रयत्न करतात.मागील वर्षी यवतमाळ येथे पोलीस भरती झाली होती त्यात अंबादास सोनवणे या उमेदवाराने बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर केल्याचे तपासणीत आढळून आले होते.पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये गुणवत्ता व आरक्षणाच्या आधारे तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली होती, त्यामध्ये खांबा लिंबा येथील अंबादास सोनवणे या उमेदवाराची निवड झाली होती. अंबादास सोनवणे यांनी बोगस अंशकालीन प्रमाणपत्र जोडल्याचे कागदपत्र पडताळणी आढळल्याने यवतमाळ पोलिसानी बीड तहसील कार्यालयात या प्रमाणपत्राची चौकशी केली असता बीड तहसीदारांनी हे प्रमाणपत्र बोगस असल्याचा अहवाल दिल्याने अंबादास सोनवणे यांच्यावर पुन्हा दाखल झाला.अंबादास सोनवणे यांना अजय वानरे यांनी वीस हजार रुपयात अंशकालीन बनावट प्रमाणपत्र दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने आजय वानरे यांना पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेतले असता वानरीच्या चौकशीत तहसीलचा अंशकाली कर्मचारी श्रीराम शेजाळ यांच्यामार्फत प्रमाणपत्र काढण्याची माहिती समोर आल्याने अजय वानरे व श्रीराम शेजाळ दोघे रा.बीड यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता यांच्याकडे तहसीलचे बनावट शक्य आढळले यांना न्यायालसमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास दांडे करत आहे

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button