ताज्या घडामोडी

बीड-नाळवंडी रस्त्यासाठी स्वातंत्र्यदिनी तरुणाने आत्मदहनाचा इशारा दिला

रस्त्याची संपूर्ण काम करण्याचे लेखी आश्वासन द्या अन्यथा आत्मदहन करणार..प्रा.अण्णासाहेब राऊत

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड नाळवंडी हा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित असून व अर्धवट रस्ता केल्याने नाळवंडी,दहिफळ,जुजगव्हण सह जवळपासच्या खेडेगाव, वस्ती, तंड्यावरील नागरिकांना बीड ला येण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने वेळोवेळी लोकप्रतिनिधी कडे व प्रशासनाकडे मागणी करून देखील हा रस्ता प्रलंबित असून अर्धवट झाल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून याआधी सरपंच,उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी अनेक वेळा मागणी करत बीड नाळवंडी रस्ता करण्यात यावा यासाठी रस्त्यावर देखील उतरून आंदोलन केली होती.परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने नाळवंडी गावातील प्रा.अण्णासाहेब राऊत यांनी आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बीड नाळवंडी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या डबक्यात बसून आंदोलन करत, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत.15 ऑगस्ट पूर्वी हा रस्ता करून देण्याचे प्रशासनाने लेखी द्यावे अन्यथा 15 ऑगस्ट रोजी,स्वातंत्र्य दिन सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button