मनसे अध्यक्ष राज ठाकरेच्या ताफ्यावर सुपारी फेकत घोषणाबाजी
सुपारीबाज राज ठाकरे चले जाओ च्या घोषणा दिल्याने तणाव

आनंद वीर(प्रतिनिधी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरे सुरू आहेत. आज बीड शहरामध्ये राज ठाकरे यांची आगमन होणार असल्याने मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राज ठाकरे यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती.आज पाच वाजताच्या सुमारास जालना रोडवरील एका हॉटेल मध्ये थांबणार होते त्या हॉटेल समोर राज ठाकरे यांचे स्वागतासाठी पदधिकारी व कार्यकर्ते थांबले होते.हॉटेल समोर शिवसेना उबाठ गटाचे जिल्हाप्रमुख व कार्यकर्ते व मनसे कार्यकर्ते आमने सामने आले.त्यातच शिवसेना कार्यकर्त्यांनी सुपारी बाज राज ठाकरे चलेजाव, एक मराठा लाख मराठा, घोषणा देत वाहनाच्या ताफ्यासमोर सुपार्या फेकल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.आरक्षणाला विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा निषेध केला.पोलिसांनी वेळीच हद्दक्षेप करत उबाठा च्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेच्या ताफ्यापासून दूर केले.