ज्ञानराधाचे सुरेश कुटे च्या प्रॉपर्टी पोलिसाकडून जप्त करण्यास सुरुवात
कुटे च्या सील केलेल्या प्रॉपर्टीवर कर्ज किती...?

आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधाचे अध्यक्ष चेअरमन सुरेश कुटे, अर्चना कुटे,आशिष पटोदकर सह संचालक मंडळावर ठेवीदारांची फसवणूक केल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहे.सुरेश कुटे,आशिष पटोदकर सध्या चौकशीसाठी बीड पोलिसांच्या ताब्यात असून संचालक मंडळ अजूनही फरार असल्याने तपासाला गती मिळत नसल्याचे दिसत आहे.कुटे,पाटोदकर यांच्या 5000 कोटी च्या वर मालमत्ता जप्त करण्यात आली असून महाराष्ट्र मध्ये आणखी कोण कोणत्या जिल्ह्यात मालमत्ता आहे याची माहिती पोलीस घेत असून सातारा जिल्ह्यातील मिल्क प्रॉडक्ट कंपनी सील करून त्याचे बाजार मूल्य 4200 कोटी असल्याचे समजते. आशिष पाटोदकर यांची सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये तिरुपती ऍग्रो नावाने कंपनी सह आणखी तीन मालमत्ता असून त्याची किंमत 5000 कोटीच्या वर असल्यानी माहिती पोलिसाकडून मिळत आहे. यासह इतर जिल्ह्यात देखील यांच्या प्रॉपर्टी असून त्या सिल करण्याचे काम पोलिसांकडन केले जात आहे.यातूनच ठेवीदाराचे पैसे मिळण्याचा एकमेव मार्ग असून या प्रॉपर्टीवर बँकेचे किंवा इतर कर्ज आहे का? कर्ज आहे तर ते किती आहे? याची माहिती मिळाली नसून जर यावर कर्ज असेल तर त्या बँका या प्रॉपर्टीवर कायदेशीर दावा करू शकतात त्यामुळे ठेवीदारात संभ्रम निर्माण झाला असून या प्रॉपर्टीचा लिलाव करून ठेवीदाराचे पैसे मिळणार का हा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ज्ञानराधाच्या सुरेश कुटे, अर्चना कुटे सहसंचालक मंडळावर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच आहे.