ताज्या घडामोडी
ज्ञानराधाच्या सुरेश कुटे चां पापाचा घडा भरला
कुटे यांच्या बीड मधील घर,दुकान सह कुलकर्णी,आमटे च्या घरावर ईडीचे छापे

आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टी स्टेट चे चेअरमन, अध्यक्ष सुरेश कुटे,अर्चना कुटे सह संचालक यांनी ठेवीदारांचे पैसे वेळेवर न मिळाल्याने ठेवीदारांनी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून सुरेश कुटे व आशिष पटोदकर हे बीड पोलिसांच्या ताब्यात असून संचालक मंडळ फरार आहे.दि.9 ऑगेस्ट शुक्रवार रोजी रात्री ईडी च्या अधिकाऱ्यानी सुरेश कुटे यांचे बीड शहरातील हिरालाल चौकातील राधा क्लाँथ सेंटर,एमआयडीसी भागातील कारखाने,गोडाऊन तसेच संभाजीनगर मधील कारखाने सिल करून मुख्य कार्यातील कागदपत्रे,संगणक तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे, बीड मधील मुख्य कार्यालयात देखील तपासणी केल्याने सुरेश कुटे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.तसेच ज्ञानराजाधा चे संचालक कुलकर्णी,आमटे यांच्या देखील घरावर ईडीने छापे घातले आहे.ही कारवाई ईडीचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली.