बीड मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला खिंडार.
महिला आयोगाच्या सदस्य संगीता चव्हाण सह इतरांनी केला ठाकरे गटाला केला राम राम

आनंद वीर(प्रतिनिधी) शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बीडमध्ये खिंडार पडले असून महिला आयोगाच्या सदस्य संगीता चव्हाण यांनी बीड मध्ये अनेक आंदोलन व महिलांचे प्रश्न सोडवल्याने त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती, परंतु शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या मनमानी व दडपशाही कारभार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देखील त्यांनी कोणतीही कारवाई किंवा समाज न दिल्याने संगीता चव्हाण यांनी ठाकरे गटाला राम राम करत सुषमा अंधारे यांच्यावर सुपारी बाज असल्याचे गंभीर स्वरूपाचे आरोप करत शिवसेना शिंदे गटात येत्या 12 ऑगस्ट ला मुंबई येथे मुख्यमंत्र्याचे उपस्थितीत प्रवेश निश्चित झाला असल्याने विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जाणार आहे. संगीता चव्हाण सह युवा सेना प्रमुख रवी बडे,गजानन कदम यांनी प्रवेश केल्याने शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप,जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या तिघांचा प्रवेश करण्याचे निश्चित झाले असून अनिल दादानी सांगितले की मी विधानसभा लढणार व जिंकणारच असे ठामपणे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.