रायगड पोलीस भरतीत कानात डीव्हॉइस घालून परीक्षा देताना बीडचे विद्यार्थी पकडले.
लेखी परीक्षेत कानात डीव्हॉइस आढळल्याने पाच जण ताब्यात

आनंद वीर(प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने पोलीस दलामध्ये अपुरे मनुष्यबळ व युवकांना नोकरीत संधी मिळावी म्हणून मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस खात्यातील विविध पदासाठी पोलीस भरती सुरू आहे.पोलीस भरती पारदर्शक व्हावी यासाठी पोलीस अधिकाऱ्याकडून विद्यार्थ्यांची,कागदपत्राची कसून तपासणी केली जात आहे.तरीही काही विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये अनेक पद्धतीने शक्कल लढवत असल्याचे निदर्शनास येत आहे.पोलीस भरती म्हणलं की अपार मेहनत,अभ्यास, जिद्द मनी बाळगून अनेक विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताना दिसतात,पण काय विद्यार्थी गैरव्यवहार करून पोलीस भरती होतात, असाच प्रकार रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे पोलीस भरती लेखी परीक्षा दरम्यान तपासणी करताना सहा विद्यार्थ्याकडे कानात डिव्हॉइस चीफ आढळून आल्याने 1) शुभम बाबासाहेब कोरडे 2) गोरख गंगाधर गडदे, 3) किशोर रतन जाधव 4) रामदास जनार्दन ढवळे 5) दत्ता सुभाष ढेंबरे अशी लेखी परीक्षा दरम्यान कानात डीव्हाईस चीफ आढळून आलेल्या आलेल्या विद्यार्थ्यांची नावे हे विद्यार्थी बीड जिल्ह्यातील असून यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.