गेवराई तालुक्यात चोरांचा धुमाकूळ,ड्रोन कॅमेराने लोकेशन घेत असल्याचा नागरिकांचा संशय
चोरट्याने मारहाण करत अंगावरील सोने पळवले

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये सध्या चोरीच्या घटनेमध्ये सह अफवात वाढ होत असल्याने नागरिकात भीतचे वातावरण पसरले असून,पोलिसांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीत रात्रीचे ग्रस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. गेवराई तालुक्यातील गेवराई उमापुर रोडवर असलेल्या एडके वस्तीत दोन दिवसापूर्वी चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लंपास केले. जवळच असलेल्या भोजगाव येथील दिनकर संत यांच्या गेटचे कुलूप तोडून सहा ते सात चोट्याने घरात प्रवेश करत शस्त्राचा धाक दाखवत सोने लंपास केले.घरातील सामानाची नासधूस करण्यात आली तसेच घरा मध्ये पैसे न मिळाल्याने घरातील सदस्यांना मारहाण देखील करण्यात आली.या दोन्ही घटना एकाच रात्री घडल्याने गावातील नागरिकात भीतिचे वातावरण पसरले असून,गेल्या काही महिन्यापासून या परिसरामध्ये ड्रोन कॅमेऱ्याने लोकेशन घेत असल्याचं नागरिकानी संशय व्यक्त केला.धोंडराई जवळील वस्तीवरील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून चोरट्याचां बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.